English

आमच्या बद्दल

तोरणा टेन्ट्स कृषी पर्यटन दोन एकर क्षेत्रफळावर उभारलेले आहे. सपाट जागेवरची ही शेतजमीन उंच सखल खाचरात विभागलेली आहे. शेताजवळच कानिंदी नदी वाहते आहे. नदीच्या वरच्या बाजूस गुंजवणे धरण असल्याने ती बारा महिने चोवीस तास प्रवाही असते. नदीच्या बाजूलाच उंचच उंच डोंगररांगा आहेत. त्यामुळे तोरणा टेन्ट्सला एक आगळेच नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झालेले आहे. तोरणा टेन्ट्सवर नेहमीच्या वीजेसोबतच सौर उर्जेचा खास उपयोग करून घेण्यात आलेला आहे. विशिष्ठ प्रकारच्या सौर दिव्यांचा वापर करून प्रकाश योजना आखण्यात आलेली आहे. आजच्या लोडशेडींगच्या काळातही तोरणा टेन्ट्स रात्रीच्या वेळी सौर दिव्यांनी उजळून निघत आहे.

बदलते निसर्गचक्र, लहरी पाऊस, आभाळा एवढ्या महागाई मुळे हवालदिल शेतकऱ्यांनी शेतीविषयक जोडधंदे सुरु करणे अति आवश्यक आहे. याचे प्रात्यक्षिक म्हणून तोरणा टेन्ट्स कृषी पर्यटन एक उत्तम उदाहरण ठरू पाहत आहे.


Photo Gallery
Packages
Tourist Places
How to come?

संपर्क साधा

तोरणा टेन्ट्स कृषी पर्यटन

लाशीरगाव कार्यालय:
व्यवस्थापक
मु. लाशीरगाव, नसरापूर-वेल्हा रोड, तालुका - वेल्हा, जिल्हा - पुणे.
फोन: +९१ ७७९८५५०७७७ ई मेल: tornatents@gmail.com

पुणे कार्यालय:
अे -२, मातृकृपा आपर्टमेंट्स, ११३२/ १, मॉडेल कॉलनी,
हॉटेल ललित महल जवळ, फर्ग्युसन कॉलेज रोड, शिवाजीनगर, पुणे ४११०१६.
फोन: ०२० -२५६६०००१, +९१ ७७९८५५०७७७, +९१ ९४०५०१५६८९