English

व्यवस्था

पर्यटकांना तोरणा टेन्ट्सवर खालील प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

 1. निवासासाठी टेन्ट्स:
  पर्यटकांच्या निवासासाठी दिल्लीहून आणलेले खास राजस्थानी पध्दतीचे टेन्ट्स अर्थात कापडी तंबु उभारलेले आहेत. हे टेन्ट्स चारही बाजूंनी संपूर्णत: बंदिस्त असून आतमध्ये आरामासाठी कॉट्स, त्यावर गाद्या आणि पांघरण्यासाठी उबदार दुलया आहेत. प्रत्येक टेन्ट्सला स्वतंत्र वेस्टर्न टॉयलेट व बाथरूम जोडलेला आहे.

  तोरणा टेन्ट्सवर आजघडीला असे एकूण ६ टेन्ट्स आहेत. त्यापैकी २ लहान म्हणजे फॅमिली टेन्ट्स आहेत व उर्वरित ४ मोठे टेन्ट्स ग्रुप अथवा मोठ्या परिवाराकरिता आहेत.

  प्रत्येक टेन्टला गड किल्यांची नावे दिलेली आहेत. उदा. राजगड टेन्ट, सिंहगड टेन्ट, शिवनेरी टेन्ट, पुरंदर टेन्ट, विशाळगड टेन्ट व प्रतापगड टेन्ट.

  सर्व टेन्ट्स मिळून एकावेळी सर्वसाधारणत: २५-३० पर्यटकांची निवासाची सोय करण्यात आलेली आहे.

  टेण्ट्स साठी MSEB लाईट, सोलर लाईट, जनरेटर, इन्वर्टर आदि. ची व्यवस्था केलेली आहे.
 2. सुरक्षा:
  तोरणा टेन्ट्स हे पूर्णत: CCTV ने सुरक्षित आहे. टेन्ट्स जाळी व जाळीचे लोखंडी दरवाजे तसेच पत्राच्या शेडमध्ये सुरक्षित आहेत. प्रत्येक तंबूंना कुलूप आहेत व ते पूर्णतः बंदिस्त होतात. परिसराच्या सुरक्षेसाठी चार श्वान आहेत.
 3. रायगड सावली:
  पर्यटकांना बसण्यासाठी, गप्पांचा अड्डा जमवविण्यासाठी रायगड सावली नावाने झाडाखाली एक षटकोनाकृती डोंब बांधलेला आहे. तो चहूबाजूंनी ओपन असून त्यावर शेड अच्छादलेले आहे. एका वेळी २५-३० पर्यटक त्यात बसून निसर्ग अनुभवू शकतात.
 4. मचाण:
  पर्यटकांच्या खास आकर्षणाचं ठिकाण. शेताच्या उंच बांधावर आणखी ६ फुट उंचीवर निलगिरी झाडाच्या आधाराने उभारण्यात आलेले मचाण. एका वेळी सहा व्यक्ती त्यावर बसून दूरदूर पर्यंतचा निसर्ग न्याहाळू शकतात. डोंगरदऱ्या निरखू शकतात. पूर्वी शेतकरी शेताच्या मधोमध असे मचाण उभारून पक्षांपासून पिकांची राखण करायचे.
 5. शेततळे:
  तोरणा टेन्ट्स परिसरातील शेतजमिनीत छोटेखानी शेततळे बांधलेले आहे. पंधरा फुट व्यास आणि सहा फुट खोल असलेल्या या तळ्यात लहान-मोठ्यांना डुंबता येते, पोहता येते. पोहता न येणाऱ्यांसाठी खास लाईफ जॅकेटस् वा ट्युब्स्ची सोय करण्यात आलेली आहे. तळ्या भोवतालच्या केळीच्या बागेत बसून मनमोकळ्या गप्पांचा आनंद लुटता येतो.
 6. नदी:
  तोरणा टेन्ट्सच्या बाजूलाच कानिंदी नदी वाहते आहे. बारा महिने चोवीस तास सतत वाहणारी कानिंदी नदी हे तोरणा टेन्ट्सचे एक आकर्षण आहे. नदीच्या वरच्या बाजूला गुंजवणे धरण असल्याने नदीचे पाणी कायम प्रवाही असते. पर्यटकांना नदीत डुंबण्याचा मनमुराद आनंद घेता येतो. नदीच्या या किनाऱ्यापासून त्या किनाऱ्यापर्यंत सहज ये-जा करता येते.
 7. खेळ:
  लहान मुलांसाठी तोरणा टेन्ट्सवर सी-सॉ, झोपाळा, घसरगुंडी ए. खेळ ठेवलेले आहेत. मुलं येथे गोट्या, लगोर, खो-खो, लंगडी, कब्बडी, विटी-दांडू, पतंग आदि खेळ खेळू शकतात. शौकींनांसाठी चेस, कॅरम, हॉलीबॉल इ. खेळांचीही खास व्यवस्था करण्यात आलेली आहे.
 8. चिखलात खेळणे:
  मुलांना मुळातच मातीत, चिखलात खेळायला खुप आवडतं. मुलांबरोबरच मोठ्यांसाठीही खास चिखलाचे डबके तयार करण्यात आलेले असून त्यात मनसोक्तपणे खेळू शकतात. तिथेच स्वच्छ होऊन टेन्टमध्ये परतू शकतात.
 9. भाजी वाफे:
  पर्यटकांच्या जेवणातील भाज्यांकरता तोरणा टेन्ट्सवर कोथंबीर, मेथी, पालक, गवार, वांगी, भेंडी, भोपळा, काकडी, कांदे, लसून इत्यादीची लागवड ऋतूनुसार ग्रीन हाऊसमध्ये करण्यात येते. त्याच भाज्यांचा उपयोग स्वयंपाकात केला जातो.
 10. बार्बेक्यू:
  स्वत: येऊन बनवणे (Self Service)
 11. फळझाडे:
  तोरणा टेन्ट्स मध्ये पर्यटकांसाठी पपई, पेरू, आंबा, चिकू, केळी, डाळिंब, सीताफळ यांसारख्या फळझाडांची लागवड करण्यात आली आहे.


Photo Gallery
Packages
Tourist Places
How to come?

संपर्क साधा

तोरणा टेन्ट्स कृषी पर्यटन

लाशीरगाव कार्यालय:
व्यवस्थापक
मु. लाशीरगाव, नसरापूर-वेल्हा रोड, तालुका - वेल्हा, जिल्हा - पुणे.
फोन: +९१ ७७९८५५०७७७ ई मेल: tornatents@gmail.com

पुणे कार्यालय:
अे -२, मातृकृपा आपर्टमेंट्स, ११३२/ १, मॉडेल कॉलनी,
हॉटेल ललित महल जवळ, फर्ग्युसन कॉलेज रोड, शिवाजीनगर, पुणे ४११०१६.
फोन: ०२० -२५६६०००१, +९१ ७७९८५५०७७७, +९१ ९४०५०१५६८९